आशिष शेलारांचा पीए असल्याचे भासवून फसवणूक; वांद्रे पोलिसांकडून मोठी कारवाई

आशिष शेलारांचा पीए असल्याचे भासवून फसवणूक; वांद्रे पोलिसांकडून मोठी कारवाई

शेलार यांचे खासगी स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांचा पीए आणि मंत्रालयीन सेक्रेटरी असल्याचे भासवून आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करून सुरू असलेल्या खटल्यांची गोपनीय माहिती वकिलांकडून मिळवल्याचा धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एवढेच नाही तर याच माहितीच्या आधारे पैसेदेखील उकळण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शेलार यांचे खासगी स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमिन इरफान बेंद्रेकर (26 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अ‍ॅड. विजेंद्र राय, अ‍ॅड. यास्मिन वानखेडे, अ‍ॅड. इरम सय्यद, अ‍ॅड. रईस खान आणि अ‍ॅड. आफरिन यांना जुलैपासून अनोळखी कॉल येत होते. कॉल करणारा शर्मा असे नाव सांगून मंत्रालयीन सेक्रेटरी असल्याचे भासवत होता.

कारागृहांतील आरोपींची, त्यांच्यावरील प्रलंबित खटल्यांची, त्यांच्या नातलगांची माहिती आरोपीने वकिलांकडून घेतली. त्यासाठी शेलार यांचा हुबेहूब आवाज काढला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com