tomato framer
tomato framer Team Lokshahi

Video ...यामुळे काढली टोमॅटोच्या झाडाची बँड लावून मिरवणूक

कधी नव्हे ते शेतकऱ्याला टोमॅटो उत्पादनातून मिळला नफा...
Published by :
Team Lokshahi
Published on

गोपाल व्यास | वाशिम

कोणातीही जल्लोष साजरा करण्यासाठी बँड पथक लाऊन मिरवणूक काढली जाते. व्यक्तींपासून प्राण्यापर्यंतची मिरवणूक काढली जात असल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. पण वाशिमधील शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या झाडाची (tomato framer)मिरवणूक काढली. त्याला कारणही तसेच होते. यामुळे म्हटले जाते शेतकऱ्यांचा नादच खुळा...

tomato framer
UPSC Topper: परिस्थितीमुळे क्लॉस लावला नाही, इंटरनेटला बनवले गुरु अन् मिळवले यश

मागील दोन वर्षात कोरोनामुळे टोमॅटोला दर मिळत नव्हते. यामुळे शेतकरी त्रस्त होते. मात्र यंदा टोमॅटो पिकाला चांगले दर मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील देपूळ येथील ऋषिकेश गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यांना यापासून एक हजार कॅरेट टोमॅटोच उत्पन्न मिळाले त्याला 700 ते एक हजार रुपये कॅरेट प्रमाणे दर मिळाले. यामधून त्यांना एक लाख लागवड खर्च वगळता 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यांनी टोमॅटोच्या झाडाची बँड लावून गावात वाजत गाजत मिरवणूक काढून पाण्यात विसर्जन केले आहे.

देपुळ गावात सिंचनाची सोय असल्याने शेतकरी भाजीपाला लागवड करतात. मात्र भाजीपाला पिकातून फारस उत्पन्न मिळत नाही. यंदा यांनी निवड केलेल्या टोमॅटोपासून एक हजार कॅरेटच उत्पन्न मिळालं शिवाय चांगले दर मिळाले आहेत. त्यामुळं मागील दोन वर्षात झालेलं नुकसान भरून निघालं आहे. त्यामुळं मी आनंदात असून ही मिरवणूक काढली आहे.

ऋषिकेश गंगावणे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com