मोदींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत- पंकजा मुंडे
विकास माने | बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण, मला कोणीही संपवू शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले. समाजातील "बुद्धीजीवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तर खा प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. आणि प्रधानमंत्री मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की म्हणत पंकजा मुंडे यांनी क्षणभर विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण, मला कोणीही संपवू शकतं नाही. मोदींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत, असा अप्रत्यक्ष भाष्य त्यांनी केले आहे. कारण मी तुमच्या मनावर राज्य करते, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.
पंकजा मुंडे नाराज असल्याची होत्या चर्चा
महाराष्ट्र भाजपमध्ये नेत्या पंकजा मुंडे ह्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मध्यंन्तरी तर पंकजा भाजप सोडणार अश्या चर्चा राजकीय वर्तुळात चालल्या होत्या. अशातच त्यांना भाजपकडून मोठी संधी मिळाली आहे. या संधीमुळे नाराज असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम लागणार आहे.