जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर; अजित पवार गटाचा मोठा दावा

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर; अजित पवार गटाचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी शरद पवार खुद्द उपस्थित राहिले आहेत.
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी शरद पवार खुद्द उपस्थित राहिले आहेत. यावेळी आमदारांची संख्या आमच्या बाजूने अधिक असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही अजित पवार गटाने म्हंटले आहे.

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर; अजित पवार गटाचा मोठा दावा
...तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही; नांदेडप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला ठणकावलं

निवडणूक आयोगात शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. यादरम्यान, अजित पवार गटाने मोठे दावे केले आहेत. पक्षात यापूर्वी झालेल्या नियुक्त्या पक्ष घटनेला धरून नाहीत. ज्यांच्याकडे संख्याबळ अधिक, त्यांना पदाधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकार असतात.

पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असे अजित पवार गटाने म्हंटले आहे.

विधानसभेचे 42, विधानपरिषदेचे 6 आणि आमदार आमच्यासोबत असून लोकसभा, राज्यसभेचे प्रत्येकी 1-1 खासदार आमच्यासोबत आहेत. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात. जयंत पाटलांची निवड बेकायदेशीर आहे. जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीआधीच करण्यात आली होती, असाही दावा अजित पवार गटाने केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com