शनिवारच्या त्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट विचारले...
admin

शनिवारच्या त्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट विचारले...

शनिवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत मी शिवसेना सोडू का?असे स्पष्ट विचारल्याचे सूत्रांनी सांगितले.
Published by :
Team Lokshahi
Published on

Eknath Shinde : राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेत (Shiv Sena) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून म्हणजेच सोमवारपासून नॉच रिचेबल आहेत. परंतु शनिवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत मी शिवसेना सोडू का?असे स्पष्ट विचारल्याचे सूत्रांनी सांगितले.


शनिवारच्या त्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट विचारले...
एकनाथ शिंदेंची सूचक फेसबुक पोस्ट, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद धोक्यात?

गेल्या दोन वर्षांपासून एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज होते. त्यांच्या निर्णय प्रक्रियेत कुठेही स्थान दिले जात नव्हते. त्यांच्यांऐवजी नवख्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले होते. यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलवून दाखवली. यासंदर्भात शनिवारी १८ जून रोजी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यांत बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मी शिवसेना सोडू का?असे स्पष्ट विचारले.

एकनाथ शिंदे दोन वर्षांपासून राज्यातील आमदारांना आपले करत होते. त्यांनी अनेक आमदारांना हवी ती मदत केली आहे. यामुळेच आता ते नाराज असतांना त्यांच्यांसोबत आमदारांचा मोठा गट आहे. ही आमदारांची संख्या 13 ते 35 पर्यंत असल्याच्या बातम्या येत आहे.


शनिवारच्या त्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट विचारले...
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असताना देवेंद्र तातडीने दिल्लीला रवाना

शिंदे दिल्लीला जाणार

एकनाथ शिंदे सुरतला असल्याचे सांगितले आहे. ते ज्या ठिकाणी थांबले आहेत, त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन ते चार स्तरीय सुरक्षा या ठिकाणी आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ एकनाश शिंदे दिल्लीला जाणार असून त्या ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com