Bachchu Kadu | Eknath Shinde
Bachchu Kadu | Eknath Shinde Team lokshahi

...तर बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, बंडखोरीनंतर शिंदेंसमोर मोठा राजकीय पेच

बंडाच्या कटाची बच्चू कडूंना आधीच माहिती होती
Published by :
Shubham Tate
Published on

Bachchu Kadu Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेना (Shiv Sena) नेते बंडखोर आमदार महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी तिकडे गुहागरमध्ये रणनीती आखत आहेत. ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारीत आहेत. तर इकडे महाविकास आघाडी सरकारदेखील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. (Eknath Shinde will face a big political dilemma)

Bachchu Kadu | Eknath Shinde
...म्हणून हा निर्णय घेतला, बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे आरोप

अशातच आता बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंसमोर (Eknath Shinde) मोठा राजकीय पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. आमदारांची अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय? असल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Bachchu Kadu | Eknath Shinde
पवारांच्या नाराजीनंतर गृहखात्याचा मोठा निर्णय, 'त्या' सुरक्षा रक्षकांवर होणार कारवाई

भाजप किंवा प्रहारमध्ये गटाचं विलीनीकरण करण्याचाच पर्याय या बंडखोर आमदांसमोर असल्याचे दिसत आहे. 10 व्या अनुसूचीच्या परिच्छेद 4 नुसार वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही. असा तर्क काढला जात आहे.

बच्चू कडू विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशीच बंडाची कल्पना असल्याचे आता समोर येत आहे. कारण आमचाच मुख्यमंत्री होणार असं बच्चू कडू याआधी म्हणाले होते. बंडाच्या कटाची बच्चू कडूंना आधीच माहिती होती. असही बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com