Eknath Shinde Top Search : पाकिस्तानच्या गुगल सर्च ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदे आघाडीवर
महाराष्ट्रातील राजकारणात होणाऱ्या घमासाण चर्चेबद्दल फक्त देशातच नाही तर जगभरात होत असते. एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) एका निर्णयाने देशामधील राजकीय स्थिती ढवळून निघाली आहे. यावेळी महाराष्ट्रामध्येच नाही तर पाकिस्तानमध्येही एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे कोण आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचे राजकारण हदरवले आहे. अशी चर्चा पाकिस्तानमध्ये होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदेंबाबत माहिती शोधायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी एकनाथ शिंदेंच नाव गुगलवर सर्च केल्याचे समजते आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना मागे टाकत गुगलच्या सर्चमध्ये पहिल्या नंबरवर आले आहेत. फक्त पाकिस्तान नाही तर अनेक देशानी एकनाथ शिंदे कोण आहेत याबद्दलची माहिती गुगलवर सर्च केली आहे. गुगल सर्च या देशांमध्ये मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान या देशांचा समावेश आहे.
तसेच एकनाथ शिंदे कोण आहेत? एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाद्दलही गुगलवर सर्च करण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार पेचात सापडले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे गुगल सर्चच्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बंडानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 37 आमदारांसह एकूण 46 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे.