भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर : एकनाथ शिंदे

भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर : एकनाथ शिंदे

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने आघाडीवर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया
Published on

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने आघाडीवर आहे. भाजपची गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना काँग्रेसची पीछेहाट सुरु आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळाला आहे. भाजपाने दीडशे पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर : एकनाथ शिंदे
सगळी देशाची सत्ता त्यासाठीच वापरण्यात आली; शरद पवारांची प्रतिक्रिया

गुजरातेत ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे भाजपचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, गेल्या २४ वर्षांत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्व विक्रम भाजपाने मोडले. या निवडणुकीत जनतेने भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, भाजपाचे आणि गुजरातच्या जनतेचे या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. राज्यातील 182 जागांपैकी भाजप 156 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 17 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांना चार जागा मिळल्या आहेत. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com