वेदांता प्रकल्पाची चौकशी करत, दूध का दूध पाणी का पाणी करू; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा
राज्यात सध्या विविध विषयावरून राजकीय घमासान सुरु आहे. त्यातला प्रमुख विषय म्हणजे 'वेदांता फॉक्सकाँन' हा प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यामुळे राजकरणात जोरदार आरोप- प्रत्यारोप होत आहे. अशातच काल जळगाव दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रहार विरोधकांवर केलाय. चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करू, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला.
शिंदे म्हणाले की, आम्हाला ट्वेन्टी- 20 खेळायची आहे, कमी वेळेत जास्त रन काढायचे आहेत. त्याचे आव्हान मी आणि फडणवीसांनी स्वीकारले आहे. आम्ही करुन दाखवणार आहोत. आमच्यावर खूप टीका होत आहे. मात्र आपण त्याचा विचार करीत नाही. आम्हाला जनतेचे भलं करून दाखवायच आहे आणि ते आपण करणार आहोत. आम्हाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं जातयं, होय आम्ही कंत्राट घेतलं आहे, विकासच आणि जनतेला न्याय देण्याचं, प्रखर शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
मुक्ताईनगर येथे क्रिडा संकुल मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे उपस्थित होते. या सभेत मुख्यमंत्र्यांनी जबरदस्त भाषण यावेळी केले.