अवकाळीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्देश; म्हणाले, ३ हेक्टरपर्यंत...

अवकाळीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्देश; म्हणाले, ३ हेक्टरपर्यंत...

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
Published on

मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल. यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

अवकाळीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्देश; म्हणाले, ३ हेक्टरपर्यंत...
ही शेतकऱ्यांची थट्टा आहे; जयंत पाटलांचा सरकारवर घणाघात

मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली.

राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याच्या एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com