आदित्यराजाच्या कृपेनं वरुणराजानं टेंडरचा पाऊस पाडला; एकनाथ शिंदेंचा टोला

आदित्यराजाच्या कृपेनं वरुणराजानं टेंडरचा पाऊस पाडला; एकनाथ शिंदेंचा टोला

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवत ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.
Published on

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवत ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. दिशा प्रकरणामुळे गलबत भरकटलं आहे. आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर लगावला आहे.

आदित्यराजाच्या कृपेनं वरुणराजानं टेंडरचा पाऊस पाडला; एकनाथ शिंदेंचा टोला
गल्लीबोळातील नेत्या! फरांदेंच्या विधानावर अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, पुढच्या वेळेला...

एकनाथ शिंदे म्हणाले की, भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील. असा भ्रष्टाचार झाला आहे. ऑक्सिजन प्लांटमध्ये ही भ्रष्टाचार झाला. जे रुग्णांना जीवदान देण्याचे काम करत होते. काही लोकांच्या कृपेने युपीतील हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीला कामे दिली. काही नावे मी वगळली आहेत. त्याच्यात काय झाले आहे. आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला आहे.

रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे. सुरुवातीला जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. हायवे बांधनाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही दिले. हे रेकॉर्डवर आहे. कपड्यांचं दुकान होते. टेंडर मिळाले की पैसे खात्यात वळवले. पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचे. थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती, अशी टीका त्यांनी केली आहे.

रोबोटिक झू, प्रशासकीय कारवाई, लांडगे, कोल्हे, बिबट्या, तरस, पक्षाचे पिंजरे अशी सर्व कामे देण्यात आली. पेंग्विन कक्ष निगा व देखभालीसाठी काम देण्यात आले. सब का मालिक एकही मालिक आहे. अनेकदा एक-एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम दिले. या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले. बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात काम दिले. हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीचे काम दिले. वर्सेटाईल कि मल्टी पर्पज म्हणायचे ही कंपनी काय काय करते, याची जंत्री फार मोठा आहे. हे वाचून ही लोक कुठल्या थराला गेले, याचा अंदाज येतोय, असेही शिंदेंनी म्हंटले आहे.

सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण व औषध दाखवली. महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. या लुटलेल्या दौलतीमधून कुणी घरे भरली. आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोथडीत आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये. घरात बसून एक नंबर कसे होतात. तो नंबर पुढून नाही, तर पाठून होता, असाही टोला एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com