Supreme Court on Shiv Sena : एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ...याचिका फेटाळली
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. परंतु, याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी घेणार असून तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. पुढे त्यावर सुनावणी होईल. त्याच्यावर पुढे निर्णय होईल. आताच्या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण याबाबतची त्यांची याचिका फेटाळली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. परंतु, ठाकरे गटाला दोन आठवड्याचे संरक्षण दिले असून सुनावणी सुरू असेपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे ठाकरे गटाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तसेच, शिंदे गट आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.