पवारसाहेब 10 वर्ष कृषिमंत्री होते तेव्हा...; शिंदेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

पवारसाहेब 10 वर्ष कृषिमंत्री होते तेव्हा...; शिंदेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

कांद्यांच्या निर्यात शुल्कावरून राजकारण आता चांगलंच तापलं आहे. अशातच, महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Published on

मुंबई : कांद्यांच्या निर्यात शुल्कावरून राजकारण आता चांगलंच तापलं आहे. अशातच, महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावर शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे.

पवारसाहेब 10 वर्ष कृषिमंत्री होते तेव्हा...; शिंदेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
केंद्र सरकार कांदा खरेदी करणार; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अपेक्षा...

एकनाथ शिंदे यांनी कांदा खरेदीच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदी तसेच अमित शाह आणि पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार. नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2410 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

कांदा खरेदी हा मोठा निर्णय आहे. यावरुन राजकारण करू नका. पवारसाहेब मोठे नेते आहेत. ते १० वर्ष कृषी मंत्री होते. त्यावेळी असा निर्णय झाला नाही, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे. यानंतर मी आणखीन एक उदा. सांगतो साखर उद्योग अडचणीत असताना देखील केंद्राने मदत केली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com