सरकारची मोठी घोषणा! मराठा आरक्षणप्रश्नी  एकनाथ शिंदेंची महत्वाची माहिती, म्हणाले...

सरकारची मोठी घोषणा! मराठा आरक्षणप्रश्नी एकनाथ शिंदेंची महत्वाची माहिती, म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज नववा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे.
Published on

मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता यावे यासाठी अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज नववा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे.

सरकारची मोठी घोषणा! मराठा आरक्षणप्रश्नी  एकनाथ शिंदेंची महत्वाची माहिती, म्हणाले...
सामूहिक कट रचून आमच्यावर हल्ला केला; जरांगे पाटलांचा आरोप

आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे-पाटील यांनी निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत आहे. ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याबाबत अहवाल तयार करून तो एक महिन्यात सादर करेल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)चे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापुर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल, असेही शिंदेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com