अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या; एकनाथ शिंदे म्हणाले...

अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या; एकनाथ शिंदे म्हणाले...

अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारुन आंदोलन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारुन आंदोलन करण्यात आले आहे. ३० हून अधिक शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून न्याय देण्याची मागणी केली. यामुळे मंत्रालयात एकच धावपळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या; एकनाथ शिंदे म्हणाले...
अजित पवारांचे धाकटे सुपुत्र राजकारणात होणार सक्रिय?

एकनाथ शिंदे म्हणाले की, अप्पर-वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा झाली आहे. दादा भुसे, जलसंपदा विभागाचे अधिकारी, अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना सूचना दिल्या आहेत. १० ते १२ दिवसांमध्ये याबद्दल महत्वाची बैठक होईल. बैठकीत सर्व आढावा घेऊन धरणग्रस्तांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण आहे. गेल्या 103 दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं, असं त्यांचे म्हणणं आहे. पोलिसांनी आता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com