ठाकरे गटाला पकडणार कोंडीत! शिंदे गटाचा मास्टर प्लॅन तयार, उध्दव ठाकरेंवरही पडणार भारी?
पुणे : उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. हा एकनाथ शिंदेंचा मोठा विजय मानण्यात येत आहे. यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण असून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यानंतर आता शिंदे गटाने ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी मोठा मास्टर प्लॅन केल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना बजवणार व्हीप बजावणार आहे. हा व्हिप उध्दव ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हिप न पाळाल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. यामुळे आता ठाकरे गट आता चांगलेच अडचणीत सापडली असून त्यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
याचवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे दिला नाही तर तुम्ही शिंदे गटाचा व्हीप पाळणार का? की तुम्ही राजीनामा देणार का? लाचारी म्हणून व्हीप पाळणार की स्वाभिमानी म्हणून लाथ मारणार. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत विचारायचं झालं तर नामर्दांसारखा व्हीप पाळणार आहात का? की मर्दांसारखं आमदारकीला लाथ मारणार आहात, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.