मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचले! शिवसेनेचा 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख

मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचले! शिवसेनेचा 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख

निवडणुकीच्या निकालांवर मुख्यमंत्र्यांचे ट्विट; विजयी उमेदवारांचे शिंदेंकडून अभिनंदन
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका नको, अशा सूचना दिल्या आहेत. तर, दुसरीकडे शिंदेंनी एका ट्विटमध्ये शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून शिंदे विरूध्द ठाकरे वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचले! शिवसेनेचा 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख
नाशिकमधील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी; मिळवल्या सर्वाधिक जागा

राज्यभरातील 15 जिल्ह्यांतील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानुसार राज्यभरात 78 टक्के मतदान झाले. यानंतर सर्वच उमेदवारांना निकालाची उत्सुकता होती. त्यानुसार राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला असून अनेक ठिकाणी शिंदे-भाजपा युतीची सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबत शिंदे यांनी ट्विटरवरुन एक पोस्टर शेअर केले असून यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी दिली आहे. यातच एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, याआधीही एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पक्षप्रमुख उल्लेख करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. तर, आज थेट ठाकरे गट म्हणून उल्लेख केल्याने आता शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com