Uddhav Thackeray Eknath Shinde : शिवसेना कोणाची? हा प्रश्न अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. पण शिंदे आणि ठाकरेंकडून शिवसेना आमचीच हा दावा सातत्याने केला जातोय. पण शिंदें हे ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मोठी खेळी खेळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. (Eknath shinde group Uddhav Thackeray group in ganesh utsav)
सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असतानाच शिंदे गट ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचं नियोजनही त्यांनी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यासाठी गणेश उत्सवात नवी खेळी खेळली जाणार असल्याचे बोलले जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याचं नियोजन शिंदे गट करत आहे. ठाकरेंचे कार्यकर्ते फोडण्याच्या प्रयत्नात शिंदे गट दिसत आहे. त्यासाठी मुंबईतल्या शिवसेनेला अनुकूल असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना लाखोंच्या जाहिरातींच्या ऑफर दिल्या जात आहेत.
त्या बदल्यात शिंदे गटाला पाठिंबा देण्याची अट ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंचे समर्थक असलेल्या मंडळांना शिंदे गटाकडून संपर्क साधण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यांना जाहिरातींच्या आॅफर दिल्या जात आहेत.
सत्ता संघर्षाच्या काळात तळागाळातल्या, ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते फुटल्यास ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. दीड लाख शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे जमा करत बाजी मारली आहे. मात्र आता गणेशोत्सव मंडळ काय निर्णय घेणार य़ाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.