eknath shinde | vijay shivtare
eknath shinde | vijay shivtareteam lokshahi

मंत्रीपदाची संधी मिळाली तर शंभर टक्के न्याय देऊ, 'या' नेत्यानं बोलून दाखवली इच्छा मुख्यमंत्री शिंदे काय घेणार निर्णय?

मंत्रीपद नाही निदान विधान परिषदेवर संधी तरी देतील
Published by :
Shubham Tate
Published on

eknath shinde vijay shivtare : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच मला मंत्रिपद मिळाले तर पदाला शंभर टक्के न्याय देईल. जनतेची कामे करेल, मंत्रीपद नाही निदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला विधान परिषदेवर संधी तरी देतील अशी आशाही राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली आहे. (eknath shinde government says vijay shivtare)

eknath shinde | vijay shivtare
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

तसेच महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना फंड मिळत नसल्याची खंत देखील व्यक्त केली. यादरम्यान काढण्यात आलेले जीआर रद्द करण्यात यावे, त्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा या संदर्भातला पत्र देखील मुख्यमंत्र्यांना दिल्याचं शिवतारे यांनी सांगितलं.

eknath shinde | vijay shivtare
दिंडीत घुसली जीप, अपघात 14 वारकरी जखमी

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळणार आहे. भाजपकडे गृह, महसूल खाते जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com