सत्ता समीकरणांसाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची काल गुजरातमध्ये झाली भेट?
Eknath Shinde Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने ठाकरे सरकार विरोधात आता कंबर कसली असून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपल्या गटाचे नाव ठरवल्यानंतर आता विधानसभेत प्रोटेम स्पीकर नियुक्त होण्याची शक्यता आहे. यानंतरच फ्लोर टेस्ट करण्याची मागणी केली जाऊ शकते. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदेच्या (Shrikant Shinde) ऑफिसवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. तसेच मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. (Eknath Shinde Devendra Fadnavis met in Gujarat yesterday)
अशातच काल रात्री गुजरातमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. सध्या शिंदे हे गुवाहाटीमध्ये जवळपास 40 आमदारांसह तळ ठोकून आहेत. गुवाहाटीवरुन काल रात्री शिंदे गुजरातमध्ये (Gujrat) आले होते. तर फडणवीस देखील रात्री गुजरातमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. गुजरातमध्ये बडोद्यात ही भेट झाल्याचे सांगण्यात येते आहे. या बैठकीत राज्यात पुढे काय घडेल, राज्यात पुढे जाऊन कशी सत्ता स्थापन करायची यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर काल सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक झाली. ही बैठक जवळपास दोन तासांनी संपली. बंड करण्यासाठी मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ निवडली, आता आपण लढायचं आणि जिंकायचं, अस आवाहन आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. निवडून आलेल्यांना फोडून दाखवाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपला असे आव्हान केले आहे.