Uddhav Thackeray | Ekanth Shinde
Uddhav Thackeray | Ekanth ShindeTeam Lokshahi

आमचे जुने नेते काल ऑनलाईन आले, मला वाटलं...; एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला
Published on

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. उध्दव ठाकरे यांनी काल फेसबुक ऑनलाईनद्वारे मतदारांनी मविआला मतदान करण्याचे आवाहन केले व शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले होते. याचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. आमचे जुने नेते काल ऑनलाईन आले. मला वाटलं आता तरी लाईनवर आले असतील, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

Uddhav Thackeray | Ekanth Shinde
ज्यांच्याकडे पाणी मागितलं त्यांनी धरण दाखवलं; एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

आमचे जुने नेते काल ऑनलाईन आले. मला वाटलं आता तरी लाईनवर आले असतील. पणं, त्यांना समजल की आपण जाऊन काही होणार नाही. तिथं हेमंत रासने हेच निवडून येणारं.उगाच प्रवासाचा त्रास नको म्हणून ऑनलाईन भाषण केलं, असा निशाणा एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

खरतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. मुंबईत आम्ही पाठिंबा दिला. पण, इथे सांगूनही पाठिंबा दिला नाही. तर खालच्या पातळीवर राजकारण गेलेले दिसले. पणं, आता जनता तुम्हाला 26 तारखेला दाखवेल, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

दरम्यान,आपला वाघ हेमंत रासने आहे. त्याला निवडून आणायचं आहे. रॅली शो करताना रस्त्यावर आणि सगळीकडे माणसंच माणसे होती. असे दुर्लभ चित्र कसब्यात पाहायला मिळाले. सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. कसबा पेठ भाजप आणि शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. आज गिरीश बापट यांना सांगितलं तुम्ही प्रचाराला येऊ नका. पणं, त्यांच्यातला कार्यकर्ता जागा झाला आणि ते आले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com