काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण... : एकनाथ शिंदे
नागपूर : हिवाळी अधिवेशानाचे आज सूप वाजले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अधिवेशनाची माहिती दिली. विरोधकांमध्ये सगळा सावळा गोंधळ आहे. भांबवलेली परिस्थिती आहे. महाविकास आघाडीत एक वाक्यता नाही हे आजच्या परिस्थितीवरून दिसून आले. ऐकण्याची पण मानसिकता ठेवली पाहिजे ती त्यांच्याकडे नव्हती, असे टीकास्त्र त्यांनी विरोधकांवर सोडले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन वर्षाच्या अधिवेशन होऊ शकलं नाही आणि सरकार बदललं नसतं. यावर्षीही नसते झालं. कुठे तिकडे चायना, जपानमध्ये कुठे कोविड आलं. पण, असो. खरं म्हणजे विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भाची अपेक्षा असते की या भागामध्ये प्रश्न न्याय मिळाला पाहिजे हे काय प्रलंबित विषय आहे. ते मार्गी लागले पाहिजे आणि जो अनुशेष आहे तो भरून काढला पाहिजे.
त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मधले कोणी जे आहेत व्यापारी एजंट त्यांना बिलकुल कुठे संधी नाही आणि त्यामुळे म्हणजे हे शेतकऱ्यांची भावना होती लोकांची भावना होती की बोनस मिळाला पाहिजे. परंतु, मी सभागृहात देखील सांगितलं की विरोधी पक्षाने काही लावून धरलं नव्हतं. परंतु, आम्हाला माहीत होतं की धानाला बोनस दिला पाहिजे. गेल्या वर्षी दिला नव्हता. परंतु, या वर्षी आपला जे सरकार आहे. सर्व सामान्यांचे शेतकऱ्यांचे सरकार या सरकारच्या माध्यमातून लोकांना जे पाहिजे ते देण्याचा मी प्रयत्न केलाय, असेही त्यांनी म्हंटले आहे.
ते विषय उकरून काढायचे, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, भ्रष्टाचार व अनियमित झाली आहे, राष्ट्रीय पुरुषांचा अपमान झाला अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करत होते. परंतु, किंबहुना पोलिसी कारवाई त्याचा अतिरेक या सगळ्या चर्चा त्यांनी सभागृहामध्येपेक्षा जास्त बाहेर केल्या. आज मी त्यांना त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामध्ये सगळा सावळा गोंधळ आहे. भांबवलेली परिस्थिती आहे. एक वाक्याता नाही हे आजच्या परिस्थितीवरून दिसून आले. ऐकण्याची पण मानसिकता ठेवली पाहिजे ती त्यांच्याकडे नव्हती, अशी टीकाही त्यांनी विरोधी पक्षावर केली आहे.
दरम्यान, अतिशय चांगलं यशस्वीपणे अधिवेशन झालं. विदर्भाला मोठ्या प्रमाणावर आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू शकलो. त्यासाठी मी आम्ही सरकारच्या वतीने विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.