eknath shinde devendra fadnavis
eknath shinde devendra fadnavisteam lokshahi

मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा होताचं भावाने दिली 'ही' प्रतिक्रिया

फडणवीसांच्या घोषणेने मागे बसलेले भाजपचे दिग्गज आश्चर्यचकित, शिंदे कुटुंबीयांनाही सुखद धक्का
Published by :
Shubham Tate
Published on

eknath shinde devendra fadnavis : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या एका घोषणेने सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलताना काय घोषणा करणार याची माहिती भाजप (BJP) नेत्यांना नव्हती. (eknath shinde cm bjp shock devendra fadnavis)

याबाबत भाजपच्या एका नेत्याशी चर्चा केली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणालाही काहीच माहिती नाही. आम्ही सर्व पूर्णपणे आश्चर्यचकित आहोत. पक्षाच्या हायकमांडने हा निर्णय कधी आणि कुठे घेतला, याबाबत कोणालाच माहिती देण्यात आलेली नाही. या निर्णयामुळे फडणवीस यांचे समर्थक थोडे निराश झाल्याचेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र भाजप हायकमांडने निर्णय घेतला असेल तर त्याचा आदर केला जाईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

eknath shinde devendra fadnavis
...म्हणून फडणवीसांनी दिली एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. ते म्हणतात की आम्ही टीव्ही पाहत होतो, तेव्हाच कळलं की भाई एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं जात आहे. सगळ्यांप्रमाणे आम्हालाही टीव्ही पाहून ही माहिती मिळाली. आपला भाऊ नेहमीच मुख्यमंत्री होण्यासाठी सक्षम राहिला आहे, पण अशा प्रकारे त्याचे नाव जाहीर होईल, याची कोणालाच कल्पना नव्हती, असेही ते म्हणाले.

eknath shinde devendra fadnavis
रिक्षा चालक ते राज्याचे मुख्यमंत्री, असा राहिला एकनाथ शिंदेंचा प्रवास

आश्‍चर्याची बाब म्हणजे शिंदे गटातील दीपक केसरकर यांनाही भाजपच्या या निर्णयाची माहिती नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदारांना आपले नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. पण भाजप पाठिंबा देईल याची कल्पना नव्हती. मात्र भाजपने मोठे मन दाखवून हा निर्णय घेतला आहे. दीपक केसरकर यांनीही शिंदे हे चांगले व्यक्ती असल्याचे सांगितले. ते तळागाळातील नेते आहेत ज्यांना नेहमीच लोकांमध्ये राहायला आवडते.

शिंदे मुख्यमंत्री होणार हे कधी कळले, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यावर दीपक म्हणाले की, सर्वांना टीव्ही पाहूनच याची माहिती मिळाली. हे सर्वांसाठी एक मोठे आश्चर्य होते. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष सुरू आहे. डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. आपल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवल्याचा सर्वांनाच आनंद आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com