Eknath Shinde : 115 लोक असतानाही फडणवीसांनी मोठ्या मनाने मला मुख्यमंत्री बनवले
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भाजपाचे (BJP) आभार मानले. तसेच, ठाकरे सरकारवर (Thackeray Government) अप्रत्यक्ष टीकाही केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, विधीमंडळ हे लोकशाहीचे पवित्र स्थान आहे. याला विधानसभेच्या अध्याक्षांची मोठी परंपरा लाभली आहे. या सभागृहाचा अध्यक्ष झाल्यानंतर देश पातळीवर मोठी पदे भूषविण्याची संधी मिळते, असा इतिहास आहे. व याठिकाणी मी भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झालेले आहे, असे जाहिर करतो, असे त्यांनी सांगितले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. मी नगरविकास मंत्री होतो आणि माझ्यासोबत ८ मंत्री पायउतार झाले. एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा सैनिक होता. पण, ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे, असेही शिंदे यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊतांकडून वारंवार आमदारांना जबरदस्ती ठेवल्याचे आरोप होत होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी हा दावा सभागृहात फेटाळून लावत एका आमदाराला मी स्वत: चार्टर्ड विमानाने पाठवलं. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती झालेली नाही, असं त्यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 155 लोक आहेत. तर, माझ्याकडे 50 जण असतानाही मोठे मन दाखवत मला मुख्यमंत्री बनवले, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहे.