मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन;
खडसेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन; खडसेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणावरून खडसे-महाजन यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Published on

जळगाव : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाचा झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा त्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर येईल, अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारकडे केली होती. याच मुद्द्यावरून खडसे-महाजन यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन, असा इशाराच खडसेंनी सरकारला दिला आहे.

मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन;
खडसेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा
शिंदे सरकारला धक्का: टाटा-एअरबसचा 22 हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला

एकनाथ खडसे म्हणाले की, विरोधक रोज म्हणतात, काही ना काहीतरी होणार आहे. पण, काहीच होत नाही. त्यामुळे मला कितीही त्रास दिला तरी मी तुमच्या उरावर बसेन. मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

तर, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सरकारच्या आमदारांमध्ये जी अस्वस्थता आहे ते बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावरून समोर आली आहे. ज्यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. ते अपक्ष असो की इतर सर्व आमदार यांच्यात अस्वस्थता आहे. आणि तीच अस्वस्थता आता हळू-हळू बाहेर पडायला लागली आहे. आणि बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि पुढे अजून काय होत ते पहाच, या शब्दात एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

मला त्रास दिला तर मी सर्वांच्या उरावर बसेन;
खडसेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा
फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर विडा उचलाच : शिवसेना

दरम्यान, भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. या कथित भूखंड खरेदीसोबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव जोडले गेले आहे. अशातच भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. या प्रकरणात 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालंच पाहिजे. खडसे जर शुद्ध असतील तर सर्व गोष्टी बाहेर यायला हव्या, असेही गिरीश महाजन यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com