एकनाथ खडसेंनी दिली शपथविधीवर खोचक प्रतिक्रिया; शपथ घेताच फडणवीसांचं ट्वीट
Eknath Khadse on Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळालाय. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावर बोलताना आता ज्युनियर मंत्र्यांच्या हाताखाली फडणवीसांना काम करावे लागेल, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. (Eknath Khadse reacted sharply to the swearing in ceremony Devendra Fadnavis)
पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी एक ट्वीट करत पक्षाचा आदेश मला शिरोधार्य असल्याचं सांगितलं. तसेच आम्ही पदासाठी नाही, तर विचारासाठी आहोत. विचारांना पुढे नेत असताना राज्याचा विकास व्हावा, राज्यातील जनतेचा विकास व्हावा, लोकांच्या इच्छा, मागण्या पूर्ण होवोत. या सर्व गोष्टींचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी हा विचार केला आहे. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. असा पक्षादेश देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला होता.
कोण आहेत एकनाथ शिंदे
1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार.
2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.
12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता.
5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री. तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री.
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री.
आणि आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.