...म्हणून तपास यंत्रणांच्या आडून छळ; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. (eknath khadse criticized girish mahajan Sanjay Raut)
यावरून वेगवेगळ्या मार्गाने अडकवण्याचा प्रयत्न आजचा नाही, तर पहिल्यापासूनचा आहे. भोसरी प्रकरणात झोटिंग चौकशी झाली. कुठलाही तथ्य समोर नाही. झोटिंग प्रकरण आटोपले, नंतर पुण्यात एफआयआर दाखल झाला. ही चौकशी अँटी करप्शनकडे गेली. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, पुण्याच्या अँटी करप्शनने विस्तारित चौकशी केली. त्या चौकशीअंती एकनाथ खडसे निर्दोष आहे. या प्रकरणात काहीही तथ्य नाही, असा अहवाल अँटी करप्शनने न्यायालयात सादर केल्याचे खडसे यांनी सांगितले. जावयाला अटक केल्यावरूनही त्यांनी भाजपावर टीका केली.
राऊतांवरील या कारवाईवर आता भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आमदार राम कदमांनीही आता या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे."कर नाही तर डर कशाला?", असा सवाल यावेळी राम कदमांनी केला आहे."हिंमत असेल तर ईडीच्या प्रश्नांचा सामना करा", असं आव्हानच यावेळी कदमांनी दिलं आहे.