भाजपमध्ये माझे दोनच नव्हे तर अनेक समर्थक; एकनाथ खडसेंचा खळबळ जनक दावा
Eknath Khadse Statement : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक आयोजित केली आहे. राज्यसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक होणार आहे. दरम्यान अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एकनाथ खडसे यांचा विधान परिषदेत विजय होईल अशी आशा बाळगून खडसे समर्थक मुंबईकडे निघाले आहेत. (Eknath Khadse big statement in BJP supporters)
याावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, केवळ जळगावचे दोन आमदारच माझे समर्थक आहेत असे नाही. भाजपमध्ये माझे अनेक समर्थक आहेत. आणि ते आजही माझ्यावर प्रेम करतात. पण, ते पक्ष सोडून मला मतदान करतील असे वाटत नाही, असं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मत मांडले आहे. तर दुसराकडे आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार असल्याचा प्रचंड आनंद असल्याच्या भावना खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत.