Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

मुंबईत विविध ठिकाणी ईडीच्या धाडी; फडणवीस म्हणाले, हे ईडी...

यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच राजकीय मंडळींवर होणाऱ्या कारवाईमुळे ई़डीची देखील चर्चा कायम होते. दरम्यान आज सक्तवसुली संचलनालयाने मुंबईत 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. कोरोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजत आहे. शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. यावरच आता राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis
साताऱ्यातील त्या राड्यावर काय म्हणाले उदयनराजे आणि शिवेंद्रराजे?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'काय कारवाई सुरू आहे, मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की, ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आले. पुण्यात तर एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही. असे फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com