प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत; अजित पवारांची मोठी घोषणा

प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत; अजित पवारांची मोठी घोषणा

आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी अजित पवार यांनी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार अशी घोषणा केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी अजित पवार यांनी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार अशी घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एलपीजी गॅस प्रत्येत घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना जाहीर करत आहेत. या योजनेचा 52 लाख 16 हजार 400 कुटुंबाना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

याशिवाय केंद्र सरकारनं सांगितलं की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्य लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी दिली जाईल. केंद्राचं एलपीजी अनुदान आता उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन घेतलेल्या 9 कोटी गरीब महिला आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com