साताऱ्यातील प्रति बाळासाहेब ठाकरे शिंदेंच्या सभेसाठी मुंबईकडे रवाना
प्रशांत जगताप | सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी आज बीकेसी मैदान येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. साताऱ्याचे प्रति बाळासाहेब ठाकरे समजले जाणारे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे भगवानराव शेवडे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
भगवानराव शेवडे हे पायाने अपंग असून ते सातारा शहरामध्ये तीन चाकी रिक्षा मधून प्रवास करत असतात. गेली कित्येक वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच हुबेहूब वेशभूषा ते परिधान करून सगळ्यांचं लक्ष वेधत असतात. आजच्या बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी साताऱ्याचे प्रति बाळासाहेब ठाकरे हे यांना स्टेज वरती बसण्याचा मान आणि भाषणाचा मान देण्यात येणारा असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे.
शेवडे हे स्वतः शिवसैनिक असून ते शिवसेनेचे सदस्य आहेत गेल्या कित्येक वर्षापासून सातारकर त्यांना प्रति बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखतात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांना 11 वेळा रजिस्टर पत्रव्यवहार त्यांनी केला आहे. पण एकाही रजिस्टर पत्राची नोंद त्यांनी घेतली नाही. त्या रजिस्टर पत्राच्या पावत्या प्रति बाळासाहेब ठाकरे असलेल्या भगवानराव शेवडे यांच्याकडे आहेत. पण या एकाही पत्राची छोटीशी नोंद देखील घेतली गेली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.