राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

NCP सचिव प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवरुन Sharad Pawar यांच्या निर्णयाची माहिती दिली
Published on

मुंबई : शिवसेनेत अस्थिरता असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय महाराष्ट्राला लागू होणार नाही.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय
Presidential Election Results : कोण असणार नवे राष्ट्रपती यशवंत सिन्हा का द्रौपदी मुर्मू?

प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटले की, शरद पवारांच्या संमतीने राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तात्काळ बरखास्त करण्यात आले आहे. यामधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला वगळण्यात आले आहे.

हा निर्णय महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेमधील बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार अवघ्या तीन आठवड्यातंच कोसळले. अशातच शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com