दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश, ठाकरे गटाला खिंडार
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे प्रचंड राजकीय घडताना दिसत आहे. मात्र, ठाकरे गटातील गळती आजही थांबण्याचे नाव घेत नाहीय. कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला पुन्हा एका धक्का बसणार आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार अश्या चर्चा होत्या. मात्र, आता उद्या दिपाली सय्यद ह्या शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे या भूमिकेत होत्या. त्यानंतर त्या नाराज असल्याच्याही चर्चा रंगला होत्या. मात्र नुकताच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी शिंदे गटात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आज दुपारी 1 वाजता दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे पक्षप्रवेशाचे ठिकाण ठाणेतील टेंभीनाका असणार आहे.
काय म्हणाल्या होत्या दिपाली सय्यद?
नुकताच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी मी स्वीकारणार. प्रवेशाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. राजकारणात प्रत्येकजण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येत असतो. पण जर काही कारणांमुळे पक्ष फुटत असेल तर मग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, काम कऱण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे,” “खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं पाहिजे. तसंच मुंबई महापालिके नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हेदेखील कळलं पाहिजे,” असे दिपाली सय्यद त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हणाल्या होत्या.