Dilip Walse Patil: जनतेनं एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही

Dilip Walse Patil: जनतेनं एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आपल्याकडं शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.

तसेच ते म्हणाले की, जनतेनं एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल. असे वळसे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com