शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले...

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले...

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा गेले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांना शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? असे विचारण्यात आले. यावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. हा सामुदायिक निर्णय आहे. ४० आमदारांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा निर्णय घेतला आहे.शरद पवारांची साथ सोडली, याचं मनामध्ये १०० टक्के दु:ख आहे. परंतु कधी-कधी असा निर्णय घ्यावा लागतो. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com