स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे....धीरेंद्र महाराज अन् अनिसच्या वादात कदमांची उडी
मागील दोन ते तीन दिवसांपासून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र महाराज हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिव्यशक्ती असल्याचा दावा हे महाराज करतात. गेल्या आठवड्यात धीरेंद्र महाराज यांनी नागपूरमध्ये दिव्य दरबारवर आयोजित केला होता. मात्र, त्यांच्या दरबारावर अनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी टीका केली होती. तसेच महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध केली, तर ३० लाख रुपयांचं बक्षिस देईन, असे आव्हान दिले होते. त्यामुळे देशभरात एकच महाराज चर्चेत आले. आता त्यावरच आता भाजप आमदार राम कदम यांनी श्याम मानव यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले राम कदम?
स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे अनेकदा विज्ञानावरही विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे. आमच्या साधु-संतांवर टीका केल्यानंतर ते लगेच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेस सहभागी होतात. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन फिरताना दिसतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलनकार जी टीका करत होते, ती राहुल गांधींची स्क्रिप्ट होती का? हे सर्व काँग्रेसने ठरवून केलं होतं का? कारण काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नाही. अशी टीका राम कदम यांनी केली.