अजित दादांचा  वारंवार अपमान झाला; धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

अजित दादांचा वारंवार अपमान झाला; धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यावेळी अजित पवारांच्या बैठकीत बोलताना धनंजय मुंडे गहिरवले.
Published on

मुंबई : ज्या व्यक्तीचा वारंवार अपमान झाला मान खाली घालावी लागली ती व्यक्ती आहे अजित दादा, असे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे. राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यावेळी अजित पवारांच्या बैठकीत बोलताना धनंजय मुंडे गहिरवले.

अजित दादांचा  वारंवार अपमान झाला; धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
आम्हाला कायद्याचं ज्ञान; छगन भुजबळांचा शरद पवार गटावर निशाणा, सगळी व्यवस्था केलीयं

धनंजय मुंडे म्हणाले की, शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून प्रफुल्ल पटेलांनी काम केले. छगन भुजबळ यांनी अनेक कठिण प्रसंगात साहेबांसोबत होते. साहेबांसोबत राजकारण करताना अजितदादांना किती वेदना सहन कराव्या लागल्या. पण ते कधीही काहीही बोलले नाहीत. त्यांनी सगळं सहन केलं. आज या व्यासपीठावर बोलताना माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, पण माझं मनं रडतंय. ज्या व्यक्तीचा वारंवार अपमान झाला, मान खाली घालावी लागली ती व्यक्ती आहे अजित दादा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

आज मला बोलायची ताकद कोणी दिली तर ती अजित दादा. या सगळ्या लोकांनी तुम्हाला साथ दिली. काही झालं की दादांना पुढे केलं जात. मला त्यांना सांगायचे की आपल्या गिरेबानमध्ये जरा झाकून पहा. आजपर्यंत अजित दादांनी अनेक गोष्टी साहेबांसाठी केल्या. आपल्या सावलीला सुद्धा कळू दिल्या नाही. दादा नियती तुमच्या सोबत आहे. तुमची नियत साफ आहे. स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतोय.

आमचे गुरू आणि दैवत साहेब आहेत. इथे उपस्थित असलेले लोकांनी साहेबांसाठी आणि साहेबांनी त्यांच्यासाठी खूप केले. पण लोकशाही मानणाऱ्या आमच्या साहेबांनी ही लोकशाही मान्य करावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com