काँग्रेसचा विरोध मोदींना की टिळकांच्या नावाला; धनंजय मुंडेंचा सवाल

काँग्रेसचा विरोध मोदींना की टिळकांच्या नावाला; धनंजय मुंडेंचा सवाल

धनंजय मुंडेंची कॉंग्रेसवर जोरदार टीका
Published on

विकास माने | बीड : ज्या टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या टिळकांच्या नावाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जात असताना काँग्रेसने टीका करणे चुकीचे आहे. काँग्रेसला मोदींना विरोध करायचा आहे की टिळकांना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हंटले आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचा विरोध मोदींना की टिळकांच्या नावाला; धनंजय मुंडेंचा सवाल
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या काळात; शरद पवारांचा अप्रत्यक्ष टोला

राज्यात सध्या शेतकरी पिक विमा भरत असून महायुतीच्या शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना जाहीर केल्यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही पिक विमा भरता येत नव्हता, त्यांच्या पिकांनाही आता यावर्षी संरक्षण मिळू शकणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, राज्यात जून, जुलैमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असला तरी काही भागात पावसाची सरासरी कमी आहे. आता ऑगस्टमध्येही मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. अशा स्थितीत फळबागांचे होणाऱ्या नुकसानीवर काय उपाययोजना करता येतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com