राजकारण
छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन
छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ मुंडेंनाही धमकीचा फोन
मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. छगन भुजबळ यांच्या धमकी पाठोपाठ आता धनंजय मुंडेनाही धमकीचा फोन आला आहे.
अशी माहिती मिळत आहे की, मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून धमकावल्याचं समोर आलं आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. 50 लाख रूपये द्या अन्यथा…, असं म्हणत धनंजय मुंडे यांना फोन आला आहे.