राऊत आणि ठाकरे सेनेला हफ्ता बंद झाला म्हणून मोर्चा काढला का? भाजपचा खोचक सवाल

राऊत आणि ठाकरे सेनेला हफ्ता बंद झाला म्हणून मोर्चा काढला का? भाजपचा खोचक सवाल

नाशिकमधील ड्रग्स रॅकेटविरोधात संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या टीकेला आता भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Published on

नाशिक : नाशिकमधील ड्रग्स रॅकेटविरोधात संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. यावेळी राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेला आता भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचा आरोप देवयानी फरांदे यांनी केला. संजय राऊतांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राऊत आणि ठाकरे सेनेला हफ्ता बंद झाला म्हणून मोर्चा काढला का? भाजपचा खोचक सवाल
रावणाचा वध दसऱ्याच्या आदल्या दिवशी करा, शिंदे सरकारची नवीन परंपरा; कुणी केली टीका?

ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी होता. संजय राऊत सकाळी उठून बोलतात. एक तर संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत. नाही तर ते अमली पदार्थांचे सेवन करत असतील. त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी जोरदार टीका देवयानी फरांदेंनी केली आहे. मुंबई पोलिसांनी नाशकात येऊन कारखाना उद्ध्वस्त केला. सोलापूरला कारखाना उद्ध्वस्त केला. आणि ललित पाटील याला अटक केल्यानंतर ठाकरे गटाने मोर्चा का काढला? संजय राऊत आणि ठाकरे सेनेला जाणारा हफ्ता बंद झाला म्हणून मोर्चा काढला का, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

ड्रग माफियावर मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी कधीही कारवाई केली नाही. उध्दव ठाकरे यांच्या काळात व्यापाऱ्यांचे अपहरण केलं जातं होतं आणि खून केल जातो. आणि इथे येऊन जर तुम्ही नाकाने कांदे सोलात असेल तर हे दुर्दैव. ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून कामचुकारपणा झाला असेल तर चौकशी केली जाईल, असेही देवयानी फरांदेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com