Sanjay Raut | Devendra Fadnavis
Sanjay Raut | Devendra FadnavisTeam Lokshahi

सकाळी 9 वाजता टीव्हीवर साहित्य ओसंडून वाहताना दिसतं; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर असून 96व्या मराठी साहित्य संमेलनाला भेट दिली आहे.
Published on

वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर असून 96व्या मराठी साहित्य संमेलनाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी मंचावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली. राजकारणात आमच्यातलाही साहित्यिक ओसंडून वाहत असतो. सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की साहित्य ओसंडून वाहताना दिसतं, असा खोचक टोला फडणवीसांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sanjay Raut | Devendra Fadnavis
'पराभवाच्या भीतीनं निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन'

महात्मा गांधी यांच्यावर जितकी पुस्तक लिहिली गेली तितकी कधी लिहिली गेली नाही. साहित्याच्या व्यासपीठावर इतके राजकारणी काय करतात. पण, आमच्यामुळे साहित्यिक आहे. आम्ही नसलो तर व्यंगचित्र कोण काढणार? आम्हाला थोडीशी जागा मिळते आणि ती थोडीशी जागा कशी व्यापून टाकायची ते आम्हाला चांगलं जमत, असे फडणवीसांनी म्हणातच सभागृहात एकच हशा पिकला.

तर, संजय राऊत यांच्यावर फडणवीसांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून खोचकपणे टीका केली आहे. आमच्यातील साहित्यिक ओसंडून वाहताना दिसतो. सकाळी 9 ला टीव्ही लावली की साहित्य ओसंडून वाहत असतो, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी येथील भराडी देवी यात्रेला देवेंद्र फडणवीस यांनी काल हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. यावर संजय राऊतांनी सकाळी प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील देव अधिक जागरूक असतात. भराडी देवी हे जागृत देवस्थान असून पापी लोकांना आशीर्वाद देत नाही, असा टोला शिंदे-फडणवीसांना लगावला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com