श्रध्दा वालकर प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

श्रध्दा वालकर प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

श्रध्दा वालकर प्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती. ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.
Published on

नागपूर : श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत केली. श्रध्दा वालकर हिची झालेली निर्घृण हत्या व त्या घटनेचे सामाजिक परिणाम लक्षात घेऊन अशा घटना पुन्हा घडू नये याबाबत कायदा करणार का? अशी विचारणा करीत आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती.

श्रध्दा वालकर प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीस बोलतानाच सभागृहाची बत्ती गुल; रोहित पवारांनी साधला निशाणा

यावर बोलताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले. श्रध्दा वालकर हिने सदर आरोपीकडून आपल्या मारहाण झाली होती, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. मग, गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही? दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले. त्याला एक वर्षे उशीर का झाला? त्या कागदावर तारखेत खाडाखोड करण्यात का आली? असे प्रश्न उपस्थितीत केले.

मागील अडीच वर्षाच्या काळात तसेच तत्कालीन सरकारने घेतलेल्या भूमिका या संशयास्पद होत्या. त्यामुळे या प्रकरणी कोणता दबाव होता का? अशी शंका येते. त्यामुळे विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com