लाल संविधान का? कुणाला तुम्ही इशारा देत आहात?; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी यांना सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत जोडो हा जो काही समूह तयार करण्यात आलेला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अशा आहेत कि ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. ज्यांची ध्येयधोरणं जर आपण बघितली, ज्यांची कामाची पद्धत आपण बघितली तर ही अराजक पसरवणारी अशाप्रकारची संपूर्ण पद्धत आहे.
एकिकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात खरं म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे पण मग लाल संविधान का? कोणाला तुम्ही इशारा देत आहात? लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्याठिकाणी इशारा देत आहात?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रिक करुन समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम याठिकाणी होत आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.