devendra fadnavis | sudhir mungantiwar
devendra fadnavis | sudhir mungantiwarteam lokshahi

चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर आता मुनगंटीवारांच्या विधानाचा अर्थ काय?

विश्वासघात शिवसेनेच्या नेत्यांनी केला; सुधीर मुनगंटीवार
Published by :
Shubham Tate
Published on

sudhir mungantiwar : राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. शिंदे सरकारची वैधता, शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांची निवड या सर्व प्रकरणांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्ट पुर्वी होणार असल्याचे म्हटले आहे. (devendra fadnavis people see sudhir mungantiwar says)

devendra fadnavis | sudhir mungantiwar
Amazon Sale : सॅमसंग स्मार्टफोनवर बंपर ऑफर

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यासोबतचं एक मोठं विधान केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री म्हणून जनता पाहत होती, त्यामुळे भाजपला नाईलाजास्तव शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं का? असाही सवाल निर्माण झाला आहे. तर मुनगंटीवार यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरेंवरही पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवलाय. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही सांगताय मातोश्रीवर शब्द दिला. मात्र अमित शहा असं काही बोलले नव्हते. विश्वासघात शिवसेनेच्या नेत्यांनी केला, भाजपच्या 105 जागाच येतात हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग हे अशा कथा निर्माण झाल्या, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

devendra fadnavis | sudhir mungantiwar
CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला हॉकी संघाने 16 वर्षांनंतर जिंकले पदक

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा पुनरुच्चार करत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांनी कोणतीही तारीख दिलेली नाही. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी यापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारपूर्वी होणार असल्याचे सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी जाहीर केले की मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टपूर्वी होईल जेणेकरून पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात राष्ट्रध्वज फडकावता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com