रश्मी वहिनी समोरच उद्धव ठाकरेंनी...; फडणवीसांनी व्यक्त केली 'ती' खंत
मुंबई : अडीच वर्ष-अडीच वर्ष मुख्यमंत्री फॉर्म्युला ठरला होता, असे दावा उध्दव ठाकरेंकडून केला जातो. परंतु, या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढले आहेत. तसेच, रश्मी ठाकरेंचे नाव घेत फडणवीसांनी 2019 निवडणुकीच्या बैठकीदरम्यानची खंतही व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९साली युतीची बोलणी सुरु होती. एका रात्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आम्हाला एकदा तरी मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे. मी रात्री १ वाजता अमित शहा यांना फोन लावला. त्यावेळी अमितभाईंनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. खाती व मंत्री पद द्यायची तयारी होती. पण, मुख्यमंत्री पद देता येणार नाही अन्यथा बोलणी थांबवा. मग मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आणि त्यानंतर ते घरी गेले. पुन्हा बोलणीसाठी एक मध्यस्थी पाठवला.
ज्या बाळासाहेबांच्या खोली बद्दल ते सांगतात. त्याच खोलीत उद्धव ठाकरे व अमित भाई बसले होते. यात पत्रकार परिषदेत एकटे फडणवीस बोलतील, असे दोघांनी ठरवले होते. यानंतर पत्रकार परिषदेत काय बोलायचे याची उजळणी झाली. यावेळी रश्मी वहिनी तेथे आल्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर पुन्हा म्हणायला सांगितले.
या गोष्टी बोलायच्या नसतात, पण बोलावे लागते आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक सभेत आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे सांगण्यात आले. आपण विश्वास ठेवला व गाफील राहिलो, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.