...तेव्हाच उध्दव ठाकरेंसोबत माझे ट्युनिंग संपले; फडणवीसांचा खुलासा
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. 2019 च्या निवडणुकीनंतर उध्दव ठाकरेंनी माझ्याशी फोनवर बोलण्याचे बंद केले. तेव्हा हे ट्युनिंग संपले, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.
उध्दव ठाकरेंनी माझ्याशी फोनवर बोलण्याचे बंद केले. तेव्हा हे ट्युनिंग संपले. जेव्हा तुम्हांला वाटते की मला नाही बोलायचे तसे तुम्ही सांगा. मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले. त्यामुळे ट्युनिंग बाबत त्यांनाच विचारा. उद्धवजींनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु केल्याचे लक्षात आले. तेव्हा आम्ही राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु केली. त्यांनी जेव्हा फोनवरून बोलणे बंद केले तेव्हा पर्यायी मार्ग शोधण्याची गरज होते. प्लॅन बी ची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
राज्यात सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावरुन विरोधकांनी अनेकदा फडणवीसांना चिमटेही काढले होते. मी या सरकरामध्ये १०० टक्के कम्फर्टेबल आहे. एक पॉज आला होता. मध्यंतरी सरकारने तो आणला होता. आता शिंदे मुख्यमंत्री असून तो पॉज दूर झाला आहे. आता टीम लीडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. मी टीमचा एक भाग आहे. मी या सरकारमध्ये पूर्ण समाधानी आहे. त्यामुळे अनेकांना त्रास होतोय. पण तो होऊ द्या, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करू नये. जेव्हा न्यायालयात सुनावणी झाली. त्यात अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तो आम्ही कसा रद्द करायचा? यावर माझे वकिल म्हणून मत आहे. सर्वोच्च न्यायालय हे कधीही विधीमंडळ कामकाजात ढवळाढवळ करत नाही. जिथे अन्याय होईल तिथे मार्ग दाखवेल, असे फडणवीस म्हणाले आहेत.