फडणवीसांचा राऊतांना टोला; मानसोपचारमुळे ठीक होईल का? वेड्याच्या इस्पितळात...
छत्रपती संभाजी नगर : फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, “आम्ही ‘सामना’ वाचत नाही.” पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण, असे म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. सामना रोखठोकमधून फडणवीसांवर राऊतांनी टीकास्त्र सोडले होते. यावर आता फडणवीसांनी पलटवार केला आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे देवेंद्र सेवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या नावाने महोत्सव व्हावा अस मी एव्हडा मोठा नाही. येथे सगळ्या प्रकारचे डॉक्टर ठेवले आणि मानसोपचार तज्ञ ठेवले आहेत. जे रोज सकाळी बोलतात त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे स्क्रिनिंग करा. मानसोपचारमुळे ठीक होईल का? किंवा वेड्याच्या इस्पितळात न्यावे लागणार हे समजेल, असा जोरदार टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.