नार्वेकरांच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, शिंदे सरकार...

नार्वेकरांच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, शिंदे सरकार...

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या पेचावर ऐतिहासिक निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे अभिनंदन केले आहे.
Published on

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे अभिनंदन केले आहे.

नार्वेकरांच्या निर्णयावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, शिंदे सरकार...
सेना कुणाची हे ठरवणारं नार्वेकर कोण? उध्दव ठाकरेंचे टीकास्त्र, SC ने सुमोटो कारवाई करावी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.

पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com