कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; फडणीसांचं विधान
नागपूर : जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तर, मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाचा धक्का लागू देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संकल्पबद्ध मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात स्पष्ट घोषणा केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, सभेत कोण काय म्हणाले मला त्याबद्दल माहिती नाही. कारण की मी प्रवासात होतो त्याबद्दल मी काही बोलणार नाही. मी काही ऐकलं नाही तर मी त्यावर बोललो असतो मात्र ऐकलं असल्यामुळे मी बोलणार नाही, असे म्हमत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळांच्या निर्णयाबद्दलही फडवीसांनी माहिती दिली आहे. कमिटीने शिफारशी केल्या होत्या त्या अनुषंगाने एक रोड मॅप मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आलेला आहे. या शिफारसी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल आणि महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आणता येईल यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. जो रोड मॅपवर त्या संदर्भात प्रत्येक विभागासोबत बसून त्याचा इम्प्लिमेंटेशनचा व्हेईकल पद्धतीनं तयार केलं पाहिजे. त्यादृष्टीने पुढची कारवाई होईल. एक चांगली सुरुवात झालेली आहे निश्चितपणे गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना देता येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.