राजकारणातले दुकान वाचवण्यासाठी 'ते' एकत्र; फडणवीसांचा इंडिया अलायन्सवर घणाघात
कल्पना नळसकर | नागपूर : इंडिया अलायन्सची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. यावरुन महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच, पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. इंडिया अलायन्स तयार झाली आहे. परंतु, या इंडियाला कुठलाही अजेंडा नाही, अजेंडा लेस अशा प्रकारची अलायन्स आहे, असे टीकास्त्र फडणवीसांनी इंडिया अलायन्सवर सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिया अलायन्स तयार झाली आहे. परंतु, या इंडियाला कुठलाही अजेंडा नाही, अजेंडा लेस अशा प्रकारची अलायन्स आहे. केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते आले आहेत. अशा प्रकारचा अजेंडा आणला आहे. ते मोदींच्या मनातून काढू शकत नाही. मोदींचे त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्वामुळे आणि ज्या प्रकारे देश त्यांनी प्रगतीवर नेला त्यामुळे लोकांच्या मनात ते आहेत.
गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या मनात मोदी आहेत. त्यामुळे सर्व देशाचं विचार करण्याचं काम मोदींनी केलं म्हणून मोदी लोकांच्या मनात आहेत आणि म्हणून हे जे काही या पार्टी एकत्र आल्या आहेत. ते देशाचा विचार करण्याकरता नाही तर आपली राजकारणातले दुकान बंद होतं आहेत हे दुकान कसे वाचवायचे याकरीता हे एकत्र आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
तसेच, आतापर्यंत पाच पक्षांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे. यांनी कितीही ठरवलं तरी जनतेला पटलं पाहिजे. यांचा कोणताही उमेदवार जनतेला पटत नाही. त्यामुळे ठीक आहे. ते एकत्रित येऊन आणि त्या ठिकाणी बॅनरबाजी करून आणि घोषणाबाजी करून आपला देखील टाईमपास ते करत आहेत. याचा कोणताही परिणाम होईल, असं मला बिलकुल वाटत नाही, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.